पालघर – योगेश चांदेकर:

पालघरचे नवे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहेत. एम. एस्सी., जी. डी. सी. अ‍ॅन्ड ए. डी. सी. ए., एल. एल. बी. आदी शैक्षणिक पदव्या प्राप्त केलेल्या शिंदे यांनी १९९६ मध्ये परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक या पदावर कारकीर्दीस सुरुवात केली. आजवर विशेष सेवा पदक, आंतरिक सुरक्षा पदक, विशेष सेवा पदकांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे हे उत्तम सायकलपटू आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक असताना दत्तात्रय शिंदे साहेब यांनी रायफल शूटिंग खेळात सुवर्ण पदकासह बेस्ट शुटरचा बहुमान पटकावला होता. त्यांनी यापूर्वी गडचिरोली, गोंदिया, सोलापूर, नवी मुंबई, मुंबई, सांगली, जळगाव येथे विविध पदांवर काम केले आहे. अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी अशी आजवरची त्यांची कारकीर्द राहिली आहे.

दत्तात्रय शिंदे यांनी सिंधुदुर्गमध्ये आदर्शवत कामगिरी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक पदाच्या काळात त्यांनी गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी विशेष मोहीम सुरू केली होती. गुन्हेगारांना पकडण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन, महिलांच्या सुरक्षिततेसाठी एफआयआर अ‍ॅप, प्रतिसाद अ‍ॅप व दामिनी पथक तैनात करणे याला त्यांनी प्राधान्य दिले होते. तक्रारींचे निवारण तात्काळ करता यावे यासाठी त्यांनी सोशल मीडिया विशेषत: व्हॉटस् अ‍ॅपच्या वापरावर भर देण्याच्या सूचना केल्या होत्या आणि सहकाऱ्यांनी देखील त्याचा प्रभावी वापर केला. त्यांनी यापूर्वी गडचिरोली, गोंदिया, सोलापूर, नवी मुंबई, मुंबई, सांगली, गडचिरोली येथे विविध पदांवर काम केले आहे. अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी अशी आजवरची त्यांची कारकीर्द राहिली आहे.

जळगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आल्यानंतर शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या शिंदेंनी शिस्तीची सुरूवात स्वतःपासून केली. आपल्याच खात्याला शिस्त लावण्याच्या प्रयत्नात त्यांनी आजवर असलेल्या कर्मचार्‍यांच्या पारंपारिक सवयी आणि मनमानीच्या पार चिंढड्या काढल्या. अधीक्षक दत्तात्रय शिंदेंनी जळगावकरांना देखील शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. अवैध धंदे चालकांच्या नांग्या ठेचल्या. जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात तुम्हाला कामानिमित्त दुचाकीवरून जायचे असेल तर त्याठिकाणी वाहनचालकांनी हेल्मेट घातलेच पाहिजे हा पायंडा त्यांनी सुरु केला. अधीक्षक असताना शिंदे यांनी वाहतुकीच्या नियामांबाबत जागरुकता व्हावी यासाठी मोहिम तीव्र केली. विशेष म्हणजे, या शिस्तीतून पोलिस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना देखील सुटका दिलेली नव्हती.

सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असताना दत्तात्रय शिंदे यांनी जिल्हाभर लोकसंवाद वाढवण्यासाठी सायकलवरून दौरा केला होता. पंधरा दिवस पोलीस अधिकाऱ्यांचे पथक सायकलवरून जिल्हाभर फिरले होते. सामान्य माणसाला पोलीस हे मित्र वाटायला हवे त्यांच्यामध्ये सुसंवाद असावा हा यासाठी ते नेहमी आग्रही राहिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here