पालघर: साधू हत्याप्रकरण; दोन पोलीस अधिकारी निलंबित

0
444

पालघर – योगेश चांदेकर:

गुरुवारी रात्री डहाणू तालुक्यातील गडचिंचले परिसरात दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाला गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून त्यांची हत्या प्रकरणी कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर काटारे यांच्यावर कामात कचुराई केल्याचा ठपका ठेवून पालघर पोलीस अधीक्षक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. हे प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संपूर्ण देशभर या प्रकरणावरून सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सदर कारवाई करण्यात आल्याचे समजते.

दरम्यान पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या प्रकरणात 101 जणांना अटक केली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी चालू आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच संपूर्ण देश कोरोनाशी लढत असतांना या घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न काही राजकीय नेते करत आहेत, ते योग्य नाही असेही गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here