पालघर – योगेश चांदेकर:

पालघर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन सुरू असून यामुळे ग्रामीण भागातील जनतेपुढे उदरनिर्वाहाचे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत . त्यात पालघर मधील अनेक गाव पाड्यांवर हातावर पोट असणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांना दोन वेळच जेवण सुद्धा मिळत नसून त्यांच्यासाठी शिवसेनेचे पालघर विधानसभा संघटक वैभव संखे आणि करमतारा कंपनीचे प्रमुख नायर यांनी तब्बल पाच टन धान्य मदत म्हणून प्रशासनाला दिल आहे .

सदर धान्य स्थलांतरित तसच गरजू नागरिकांना शिजवून दिल जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने डाळ, कोलम तांदळाचा समावेश असून या धान्याची किंमत जवळपास साडेतीन लक्ष रुपये इतकी आहे. दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढे येऊन प्रशासनाला सढळ हाताने मदत करावी असा आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांना केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here