पालघर ब्रेकिंग: वाडा 18 हायरिस्क पोलीसांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह!

0
394

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणातील वाडा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेल्या एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना पुढे आल्यानंतर इतर सर्वच आरोपींचे व हायरिस्क कॉन्टॅक्ट मधील पोलिसांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. वाडा पोलीस ठाण्यातील १८ पोलीस कर्मचाऱ्यांचे जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती मिळते आहे. या १८ हायरिस्क कॉन्टॅक्ट मधील पोलीस कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. असे असले तरी वाडा येथील काही पोलीस कर्मचाऱ्यांचे व सह आरोपींचे कोरोना रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे.

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांडातील अटकेत असणाऱ्या आरोपींपैकी वाडा पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेल्या एकास कोरोना लागण झाल्याचे समोर आले होते. त्याअगोदर त्या आरोपसह इतर सर्वच आरोपींना डहाणू न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी तो कोरोनाबाधित आरोपी इतर सह आरोपींच्या व पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला होता. प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्वच आरोपी व पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here