MUMBAI e NEWS :
पालघर – योगेश चांदेकर :

पालघरच्या माता बाल संगोपन केंद्राची वास्तू सध्या सलाईनवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. ग्रेन्ट मेडिकल महाविद्यालय आणि सर जेजे समूह वैद्यकीय महाविद्यालयाच्या तर्फे सुरु असलेल्या प्रसूतिगृहाची इमारत संरचनात्मक परीक्षणामध्ये धोकादायक ठरविल्यानंतर ही सदर केंद्रात सध्या महिन्याकाठी 60 ते 70 मातांची प्रसूती केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय.

1948 साली बांधण्यात आलेल्या या बालसंगोपन केंद्राच्या दुरुस्तीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असताना देखील दुरुस्ती न करताच धोकादायक इमारतीत हे माता बाल संगोपन केंद्र सुरूच आहे . या इमारतीत दुर्घटना घडल्यास मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे या माता बाल संगोपन केंद्राची दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणी पालघरचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी देखील केलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here