नंडोरे-कल्लाळे-मान रस्ता ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे उखडला

0
380

पालघर : योगेश चांदेकर –

नंडोरे-कल्लाळे-मान रस्ता ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामामुळे उखडला आहे.
रस्त्याखालची बाजु पूर्णतः भुसभुशीत होवून माती रस्त्याच्या वर आली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याची आणखिन दुरावस्था होऊन रहिवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. तसेच वाहनांच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन ठेकेदारावर कडक कारवाई करावी आणि रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शासनाच्या हायब्रीड योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या व नंडोरे-कल्लोळे ग्रामपंचायत असलेल्या नंडोरेपासून पुढे जाणाऱ्या रस्त्यावरील (प्रविण जैन यांच्या वाडीसमोर) डांबरीकरण पूर्णतः उखडून गेल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित ठीकाणी रस्त्याला दुभाजनारा नैसर्गिक नाला बुजविल्यासूळे पाण्याचा निचरा होऊन हा रस्ता उखडला आहे.

“प्रविण जैन यांच्या वाडीतून नैसर्गिक नाला अस्तित्वात होता. तेथून हे पाणी पुढे नाल्याला मिळत होते. मात्र आता नव्याने रस्त्याची बांधणी करताना हा नाला बुजविण्यात आला. परिणामी पाणी जाण्यास जागा नसल्याने ते तेथेच मुरून जात आहे. यामुळे रस्त्याखालची बाजु भुसभुशीत होवून रस्ता उखडला आहे. तसेच आणखिन दुरावस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या पावसाचा जोर वाढल्यामुळे येत्या काळात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्याचबरोबर वाहनांच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात ग्रामपंचायत उपसरपंच दिनेश कान्हात यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास लेखी कळविले आहे, तरीही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here