पोस्ट ऑफिसची ‘ही’ जबरदस्त योजना तुम्हाला देईल भरघोस मासिक उत्पन्न

0
362

नवी दिल्ली। जर आपल्याला जोखीम न घेता दरमहा काही विशिष्ट रक्कम कमवायची असेल तर पोस्ट ऑफिसची ‘पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना’ आपल्यासाठी फायदेशीर आहे. ही योजना सरकारच्या अखत्यारीत असल्याने विश्वासार्ह आहे. या योजनेतील जोखीम अत्यंत कमी आहे आणि येथे निश्चित मासिक उत्पन्न मिळते. यात जास्तीत जास्त ४.५ लाख (वैयक्तिक) आणि ९ लाख (सामायिक) जमा केले जाऊ शकतात. तर या योजनेचा मुदतपूर्ती कालावधी ५ वर्षे आहे.

  • पोस्ट मासिक उत्पन्न योजनेत (POMIS) एफडी (FD) च्या तुलनेत जास्त रिटर्न मिळतात. 
  • POMIS एक निश्चित मासिक उत्पन्न देणारी योजना आहे. 
  • या योजनेत महिन्याला कमीतकमी १५०० रूपये जमा करून खाते उघडता येते. 
  • या योजनेत ७.५ टक्के व्याज मिळते. बॅंकाच्या तुलनेत एफडीवरील हा व्याजदर १ टक्क्याने अधिक आहे.
  • दर तीन महिन्यानी व्याज दराचे कॅल्क्युलेशन केले जाते.

समजा, तुम्ही पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक केली. तर या ठेवींच्या पैशांवर पोस्ट ऑफिस प्रत्येक महिन्याला तुम्हाला २ हजार ८८८ रुपये देईल. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुमची मुद्दल रक्कम साडेचार लाख रुपये काढून घेऊ शकता. जर तुम्ही दरमहा तुमचे व्याज घेतले नाही तर ते प्रिन्सिपल रक्कमेत भरले जाईल आणि तुम्हाला संपूर्ण पैशांवर व्याज मिळेल. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपण पुन्हा या योजनेत पैसे गुंतवू शकता.

जर तुम्हाला पाच वर्षांपूर्वीच पैशांची गरज असेल तर तशी तरतूदही या योजनेत करण्यात आली आहे. आपण १ वर्षापर्यंत पैसे काढू शकत नाही. १ वर्षापासून ३ वर्षांपर्यंत आपण संपूर्ण पैसे काढू शकता परंतु पेनल्टी पोस्ट ऑफिस म्हणून २ टक्के रक्कम कपात केली जाईल. तर तीन वर्ष ते पाच वर्षे या दरम्यान १ टक्के दंड आकारला जाईल. आपण आपल्या महिन्याची कमाई थेट पोस्ट ऑफिसमधून मिळवू शकता किंवा आपण आपल्या बचत खात्यात हस्तांतरित करू शकता. किंवा आपण पुन्हा ती रक्कम गुंतवू शकता.

या योजनेत खाते उघडण्यासाठी आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. तेथे आपल्याला एक फॉर्म तसेच ओळखपत्र, पत्ता पुरावा आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो द्यावे लागतील. १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलांची खाती देखील उघडता येतील. अल्पवयीन मुलांसाठी गुंतवणूकीची कमाल मर्यादा ३ लाख रुपये आहे. यात जमा झालेल्या रकमेवर आणि तुम्हाला त्यातून मिळणारे व्याज याला कोणत्याही करात सूट मिळत नाही.जरी यात आपल्याला मिळालेल्या उत्पन्नात पोस्ट ऑफिस कोणत्याही प्रकारचे टीडीएस कपात करत नाही, परंतु आपल्याला मासिक मिळणारी व्याज वार्षिक एकूण करपात्र उत्पन्नामध्ये समाविष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here