पीएम किसान योजनेत ‘या’ एका कारणामुळे ६० लाख लोक लाभापासून वंचित; आता पैसे मिळण्याची आहे संधी, पण त्यासाठी करा ‘हे’ काम!

0
631

नवी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी य़ोजना असलेल्या पीएम किसान योजनेचा लाभ देशातील सुमारे ६० लाख लोकांना फक्त एका कारणामुळे मिळाला नसल्याचे स्पष्ट झालय. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशभरातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतजमिन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० हजार रूपये दिले जातात. परंतु केवळ आधार कार्डची माहिती अथवा प्रत न जोडल्यामुळे या शेतकऱ्यांना ६००० रूपयांपासून वंचित रहावं लागल्याचे सांगितलं जात आहे. यामुळे देशभरात लॉकडाऊनच्या काळात तब्बल १२०० कोटी रूपये शेतकऱ्यांना मिळू शकले नाहीत. जर हा घोळ झाला नसता तर हे पैसे शेतकऱ्यांच्या उपयोगी आले असते. 

याबाबत या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार आधारकार्डची माहिती चुकीची भरली गेल्यामुळे तसेच आधारकार्डची कोणतीही माहिती न दिल्याने असे झाले असल्याचे सांगितले. आता जिल्हा पातळीवर ह्या चुका सुधारण्यासाठी सरकारने वेगवान मोहिम हाती घेतली असून शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. 

आधारकार्डच्या बाबतीत झालेली चुक दुरूस्त करण्यासाठी तुम्ही स्वतही प्रयत्न करून ही चुक दुरूस्त करू शकता. त्यासाठी PM Kisan योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फार्मर्स कॉर्नवर आपली माहिती अपडेट करावी लागेल. आपल्या गरजेनुसार यातील पर्याय निवडून घबसल्या ही माहिती तुम्ही भरू शकता आणि वर्षाला पीएम किसान योजनेच्या माध्यमातून ६००० रूपयांचा लाभ घरबसल्या मिळवू शकता. 

फार्मर्स कॉर्नरवर शेतकऱ्यांना या सेवांचा लाभ मिळत आहे. 

  • पीएम किसान साठी स्वतः रजिस्ट्रेशन साठी – New Farmer Registraion
  • आधार अपडेट माहिती – Edit Aadhar failuar Record
  • शेतकऱ्यांना त्यांच्या खात्याची वैयक्तिक माहिती – BeneficiaryStatus
  • लाभार्थ्यांची यादी – Beneficiary List
  • स्वत: नाव नोंद केलेले/CSC वरून नोंद केलेले शेतकरी माहिती – Status of Self Registered/CSC Farmer
  • पीएम किसान मोबाईल अॅप – Download PM Kisan App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here