शासकीय यंत्रणांना आहार पुरविण्यास गावकऱ्यांकडूनच अडथळा!

0
372

पालघर – योगेश चांदेकर:

मुंबई आणि मोठ्या शहरांमधून गावामध्ये कोरोना संशयित येऊ नये यासाठी अनेक गावाच्या मुख्य प्रवेश रस्त्यांवर अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांकडून गावात होणाऱ्या प्रवेशबंदी साठी केलेले अडथळे शासकीय यंत्रणांना आहार पुरविण्यास अडचणीचे ठरत आहेत.

पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा तालुक्यातील अंगणवाडीतील मुलं, स्तनदा माता यांना सध्या जव्हार तालुक्यातील विनवळ येथे सुरु असलेल्या शासकीय सेंट्रल किचन मधून स्त्रीशक्ती संस्थेच्या माध्यमातून थेट गावा पर्यंत आहार पुरविण्यात येतोय. मात्र सध्या या भागातील गावांमध्ये जाणारे अनेक रस्ते गावकऱ्यांनी काट्या आणि दगड टाकून अडविल्यामुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रयत्नांची शर्थ करून हे अडथळे पार करावे लागत आहेत. या गोष्टीचा विचार करता गावकऱ्यांनी हे अडथळे थोडे शिथिल करावे अशी विनंती पुरवठाधारकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here