MUMBAI e NEWS [पालघर – योगेश चांदेकर]:
महाराष्ट्र पोलीस केंद्र चारोटी यांच्यावतीने आज 31 वा रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त सकाळी ११ वा. पासून ते दुपारी ३ पर्यंत चारोटी टोल नाका येथे सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी बस, ट्रक, कार, टेम्पो, टाटा मँजिक, रिक्षा, कंटेनर यांचे चालक व मालक यांना रस्ते सुरक्षेबाबत व नियमांचे माहीती दिली. त्यांचे काटेकोरपणे पालन करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी इंटर सेक्टर वहानातील अत्याधुनिक साधन सामुग्री व इतर उपकरणे यांची माहिती देखील देण्यात आली.

उपस्थित ३०० ते ४०० लोकांना रस्त्यावरील होणारे अपघात त्यावरील उपाययोजना व नवीन वाहन व त्यामधील साधन सामग्री यांची ओळख करून देऊन वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळण्याबाबत आवाहन केले. यावेळी उपस्थितांना माहिती पत्रके वाटण्यात आली.
या जनजागृती सप्ताहास पोलीस निरीक्षक मनोजकुमार म्हात्रे, कासा पोलीस ठाणे प्रभारी काळे, पालघर विधानसभा आमदार श्रीनिवास वनगा, डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले, माजी आमदार अमित घोडा कासा येथील सरपंच, उपसरपंच, IRB चे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास बहुसंख्येने पत्रकार, हॉटेल, धाबा मालक, रिक्षा चालक – मालक, ट्रान्सपोर्ट चालक मालक, म पो केंद्र चारोटी येथील पोलीस स्टाफ तसेच शालेय विद्यार्थी यांचीही उपस्थिती होती.