लॉकडाऊनमध्ये व्यसनापासून कायमस्वरूपी मुक्त व्हा – प्रांजल डांगे

0
762

मुंबई:

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त ‘लॉकडाऊनमध्ये व्यसनापासून कायमस्वरूपी मुक्त व्हा…’ हा प्रांजल डांगे, सायको-ऑन्कोलॉजिस्ट (समुपदेशन मानसशास्त्रज्ञ), एशिनय कॅन्सर इन्स्टिट्यूट यांचा लेख…

बदलत्या जीवनशैलीत धुम्रपान व मद्यपान करणे, ही एक फॅशन बनली आहे. एक अनुभव घेण्याच्या नादात अनेक तरुण मुलं मद्य व सिगारेट ओढतात. आणि या व्यसनाच्या आहारी जातात. एकदा का व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर त्यातून बाहेर पडणे अनेकांना शक्य होत नाही. विशेषतः धुम्रपान व मद्यपान यांसारख्या घातक सवयी आरोग्यास घातक ठरतात. त्यामुळे या व्यसनापासून दूर राहणं हा एकच पर्याय आहे. परंतु, वर्षानुवर्ष धुम्रपान किंवा मद्यपान करणाऱ्या माणसांचं व्यसन सोडवणं हे खूपच अवघड असतं. पण जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही तंबाखूच्या व्यसनापासून दूर जाऊ शकता.

महत्त्वाचं म्हणजे, हा लॉकडाऊनचा काळावधी हे व्यसन सोडण्यासाठी अतिशय फायद्याच ठरत आहे. कारण, सध्या लॉकडाऊनमुळे तंबाखूजन्य पदार्थ व मद्य लोकांना मिळत नाहीये. त्यामुळे हीच वेळ आहे तुम्ही व्यसनापासून स्वतःला दूर ठेवू शकता, असे डॉक्टर सांगतायेत.

३१ मे हा ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस आहे. या दिनानिमित्ताने लॉकडाऊनच्या काळात तंबाखूजन्य व्यसनापासून कसे दूर राहता येऊ शकते. हा कालावधीत व्यसनातून माघार घेताना कोणती लक्षणे जाणवतात याची माहिती मानसोशास्त्रज्ञ देत आहेत.

धुम्रपान व मद्यपान करणं ही आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतं. दिवसागणित व्यसनधिनतेचे प्रमाण प्रचंड वाढतेय. अतिप्रमाणात धुम्रपान केल्यास कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. यासाठी या व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात. परंतु, धुम्रपान व अतिप्रमाण मद्यप्राशन सवयीमुळे व्यक्तीच्या शरीराला त्याची सवय झालेली असते. त्यामुळे ही सवय सुटता सुटत नाही. कायमस्वरूपी हे व्यसन सोडणे व्यक्तीच्या इच्छेवरच अवलंबून असते. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कुठल्याही व्यसनापासून स्वतःला दूर ठेवता येऊ शकते.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ‘‘व्यसनाच्या आहारी गेलेली व्यक्ती धुम्रपान किंवा मद्यपान केल्याशिवाय जगू शकत नाही. परंतु, सध्या अचानक मद्य व सिगारेट मिळणे बंद झाल्याने अनेक लोक व्यसन सोडण्याचा अनुभव घेतील. कारण, कोणतेही व्यसन सोडवताना शरीरात काही विशिष्ट बदल दिसून येतात. जसे, डोकेदुखी, मळमळ, उलट्या होणे, निद्रानाश, अंगात थंडी भरणे, क्रॅप येणे असे बदल शरीरात जाणवू लागतात. काही जणांना थकवा, चिडचिड, मनःस्थिती बिघडणे किंवा नैराश्य अशा समस्येला देखील तोंड द्यावे लागते. ही सर्व व्यसनापासून माघार घेण्याची लक्षणे आहेत. या लक्षणांना त्वरीत सामोरे जाणे ही काळाची गरज आहे.’’

दारू व सिगारेट सोडण्याचे सहज-सोपे घरगुती उपाय… खालीलप्रमाणे :

  • तंबाखूचे व्यसन सोडायचे असल्यास शुगरलेस गम चावून खा. गाजरसारख्या कुरकुरीत गोष्टींची निवड करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.
  • गाजराचा रस नियमित प्यायल्यास दारूचे व्यसन सोडता येऊ शकते.
  • धुम्रपान किंवा मद्यपान हे व्यसन सोडण्यासाठी योग्य ते व्यवस्थापन करा
  • स्वतःचे लक्ष विचलित कराः- दारू किंवा सिगारेट सेवनाची इच्छा झाल्यास ती टाळण्यासाठी स्वतःचे मन विचलित करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला अन्य कुठल्या तरी कामात व्यस्त करून घ्या. घरात धुम्रपानरहित झोन तयार करण्याचा प्रयत्न करा. याशिवाय जुनी गाणी ऐका, मित्रांशी सोशल मिडियावर संवाद साधा, चित्र काढा, पुस्तक वाचणे किंवा बागकाम करणे, अशा कामांमध्ये स्वतः रमवून घ्या. यामुळे तुमचे मन आनंदी व प्रसन्न राहिल.
  • व्यसन करणाऱ्या मित्रांपासून सहसा दूर राहण्याचा प्रयत्न करा
  • धूम्रपान निवारण थेरपी – धुम्रपानाचे व्यसन सोडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राचा आधार घेऊ शकता. याशिवाय आपण स्वतःचे समुपदेशन देखील करू शकता. तसेच दारू व सिगारेट सेवनाच्या दुष्परिणामांबाबत देखील लोकांना जागरूक करू शकता. व्यसनमुक्तीसाठी तंबाखू सोडलेल्या एखाद्या व्यक्तीच मदत घेण्याचाही प्रयत्न करा. यामुळे नक्कीच फायदा होऊ शकतो.
  • व्यसन न करण्याची सवय लावा – इच्छाशक्ती असल्यास कुठल्याही व्यसनापासून दूर राहता येऊ शकतं. यासाठी सुरूवातीला एखाद्या व्यक्तीने ठरवले की, आपणं सलग तीन दिवस व्यसन करणार नाही. त्यानंतर आणखीन सहा दिवस असे जवळपास महिनाभर व्यसन न केल्यास संबंधित व्यक्तीला त्याची सवय होऊन जाते. कालांतराने हळुहळू ही व्यक्ती व्यसनापासून दूर जाते.
  • मानसिकतेचा सराव करा – व्यसन सोडवण्यासाठी व्यक्तीचे मन स्थिर असणे गरजेचे आहे. यासाठी नियमित ध्यान, योगा करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते.
  • दररोज व्यायाम करा – रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. यात चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. परंतु, अन्य व्यायाम प्रकार करताना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करणे गरजेचं आहे.
  • मानसिक स्वास्थ राखण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या – मानसशास्त्रज्ञ किंवा मनोचिकित्सकांचे समुपदेशन करणारे मानसिक आरोग्य व्यावसायिक आपल्याला आपला ताण कमी करण्यास निश्चितपणे मदत करतील आणि परिस्थितीशी सामोरे जाण्यास मदत करतील. एखाद्याने मानसिक आरोग्य व्यावसायिकांकडून मदत घ्यायला अजिबात संकोच करू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here