MUMBAI e NEWS [पालघर-योगेश चांदेकर] :

पालघर-डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे हिमांशू वर्तक व प्रतिक पाटिल ह्यांची पश्चिम रेल्वे च्या पालघर स्थानक सल्लागार समितीत निवड झाली आहे. ह्या १० सदस्य असलेल्या समितीचा कार्यकाळ १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ आसा दोन वर्षाचा असणार आहे.
प्रतिक पाटिल हे सध्या डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या पालघर स्थानक समितीचे अध्यक्षपद भुषवत असून, हिमांशू वर्तक हे डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे कार्यकारी सदस्य आहेत.
प्रवाशांच्या समस्या योग्य स्तरावर मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे आणि प्रवासी व रेल्वे प्रशासन ह्यामधिल दुवा होणे ही मुख्य जबाबादारी असल्याचे मत प्रतिक व हिमांशू ह्यांनी पालघर स्थानक सल्लागार समितीवर निवड झाल्यानंतर व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here