उस्मानाबाद प्रतिनिधी:

रिलायन्स फाउंडेशन-माहिती सेवा विभागाच्या वतीने आॅडिओ काॅन्फरसच्या माध्यमातून कोरोना संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील सामान्य महिला, गर्भवती महिला तसेच शेतकाम करत असलेल्या महिलांना कोरोना पासून वाचण्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे यावरती मार्गदर्शन करण्यात येत आहे.
दुर्धर आजारग्रस्तम व्यक्तींची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते त्यामुळे धुमेहाच्या तसेच इतर दुर्धर आजार असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेवर औषधे घेतली पाहिजेत. वयस्कर व्यक्तींनी घराच्या बाहेर जाणं टाळलं पाहिजे असं आवाहन काॅन्फरसच्या माध्यमातून करण्यात आले.

ज्या कुटूंबातील व्यक्ती अत्यावश्यक सेवा बजावत असेल अशा कुटूंबातील व्यक्तींनी घ्यावयाच्या काळजीविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
महिलांनी कोरोना विषयी निरर्थक भिती न बाळगता स्वाताची काळजी घ्यावी व गरज असल्यास जवळच्या रुग्णालयास भेट द्यावी असं आवाहन करण्यात आले.
कोरोनाविषयक सविस्तर माहिती मिळाल्यामुळे मनातील शंकांचे निरसन झाले व अनावश्यक भिती दुर झाल्याची भावना सहभागी महिलांनी बोलून दाखवली.
या कार्यक्रमासाठी तज्ञ म्हणून मंगळवेढा येथील शिर्के मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉ. शरद शिर्के व सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, उस्मानाबादचे डॉ. दिग्गज रमेश दापके-देशमुख यांनी मार्गदर्शन केले.


सदर कार्यक्रमासाठी सोलापूर सोशल फाउंडेशन, सौ. ममता कुलकर्णी व श्रीकांत कोळी यांचे विशेष सहकार्य लाभले.
नागरिकांनी शेती, आरोग्य, पशुसंवर्धन, हवामान, रोजगार याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनच्या निःशुल्क क्रमांक 18004198800 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रिलायन्स फाउंडेशनचे व्यवस्थापक संदीप गुंजाटे यांच्या वतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here