पालघर: रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरण; ‘त्या’ आरोपीला न्यायालयीन कोठडी

0
413

पालघर – योगेश चांदेकर:

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरणात अटकेतील आरोपी गणेश किसन आडगा याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपी गणेश किसन आडगा याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपीने जामीनासाठी अर्ज केला असून त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. तसेच सध्या न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपी मधुकर काकरा याच्या जामीन अर्जावर ५ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

आत्तापर्यंत एकूण ७४ शेतकऱ्यांनी दिली लुबाडणूक झाल्याची तक्रार:

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना लुबाडल्या प्रकरणी आणखी १३ शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखा पालघर यांच्याकडे केली आहे. मिळालेल्या नुकसानभरपाई रक्कमेपैकी ३५% रक्कम लुबाडणुक केल्याप्रकरणी दहा आरोपींपैकी आत्तापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. २६ जुलै रोजी डहाणू तालुक्यातील २४ शेतकऱ्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे आपली लुबाडणूक झाल्याबाबत जबाब नोंदविला. त्यानंतर आता १७ शेतकऱ्यांनी जबरदस्तीने पैसे वसूल केल्याबाबतची तक्रार दिली आहे. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार देणाऱ्या शेतकऱ्यांची एकूण संख्या आता ७४ वर पोहोचली आहे.

उद्या वाचा मुंबई ई न्यूज एक्सक्लुजिव्ह: वडापाव विक्रेत्याला जिल्हा परिषद कृषि व पशु संवर्धन सभापती सुशिल चुरी व सहकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या मारहाण तक्रारीचा वृत्तांत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here