पालघर: रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरणी एकूण ८४ शेतकऱ्यांची तक्रार..!

0
435

पालघर – योगेश चांदेकर:

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरणाला आता नवी कलाटणी मिळाली असून शेतकरी लुबाडणूक प्रकरणात आरोपीच नसलेल्या कमलाकर शिंदे या व्यक्तीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. आरोपपत्रात नाव नसताना देखील कमलाकर शिंदेनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याने त्यांचा गुन्ह्यात महत्वपूर्ण सहभाग असल्याची शक्यता सरकारी पक्षाने वर्तवली आहे.

काय आहे प्रकरण:

रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना दमदाटी करून नुकसान भरपाई पोटी मिळालेल्या मोबदल्यातील ३५ टक्के रक्कम जबरदस्तीने वसूल केल्याप्रकरणी ८४ शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखा पालघर यांच्याकडे केली होती. याप्रकरणात दहा आरोपींपैकी सहा आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. मात्र आता याप्रकरणात आरोपीच नसलेल्या कमलाकर शिंदे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

कमलाकर शिंदे यांच्या जामीन अर्जावर युक्तीवाद करताना सरकारी पक्षाने म्हणटले आहे की, ज्याअर्थी कमलाकर शिंदे जामिनासाठी अर्ज करीत आहेत त्याअर्थी त्यांचा या गुन्ह्यात महत्वपूर्ण सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कमलाकर शिंदे यांनी गुन्हा सिद्ध होऊन अटक होईल या भीतीनेच जामिनासाठी अर्ज केला आहे. कमलाकर शिंदे याने दाखल केलेल्या अर्जावर पालघर जिल्हा सत्र न्यायालयात १७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. यावेळी न्यायालय काय निर्णय घेते हे आता पहावे लागणार आहे. याबरोबरच अटकेत असणारा आरोपी मधुकर काकरा याच्या जामीन अर्जावर देखील १७ ऑगस्ट रोजीच सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here