पालघर – योगेश चांदेकर
ठाणे जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने आज ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.
देशात कोरोना या जीवघेण्या विषाणूचा प्रसार व त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती, लक्षात घेऊन बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी खरीप-१४० कोटी, रब्बी-२२ कोटी, मध्यम मुदत-३१ कोटी, तसेच वाहन, गृह, वाहन व अन्य कर्जाच्या हप्त्याना ३० जून २०२० पर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, मध्यमवर्गीय, उद्योजक व अन्य वर्गातील कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.
अध्यक्ष राजेंद्र पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळांनी यापूर्वीही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे, महिला बचत गटांना विनाविलंब कर्ज देणे अशाप्रकारचे ऐतिहासिक निर्णय घेतले होते. आज त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.