पालघर Breaking: राजस्थान कोटा येथून परतलेल्या त्या १८ जणांपैकी १६ कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह तर २ रिपोर्ट प्रलंबित

0
372
संग्रहित

पालघर – योगेश चांदेकर:

राजस्थान कोटा याठिकाणी UPSC परीक्षा अभ्यासासाठी गेलेल्या १५०० विद्यार्थ्यांना राज्यसरकारने एस टी बसद्वारे परत आणले होते. यामध्ये पालघर जिल्ह्यातील ५२ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या ५२ विद्यार्थ्यांपैकी पालघर-बोईसर येथील १८ जणांच्या स्वॅबचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. तसेच त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यापैकी १६ जणांचे कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे चिंतेत असणाऱ्या त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे.

परत आलेल्या सर्वच १८ विद्यार्थ्यांना पालघरमधील साई बाबा नगर येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. अद्याप दोघांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here