साखरा डॅम: अवैध केमिकल विसर्जन प्रकरणी व्हिडीओ व्हायरल!

0
552

MUMBAI e NEWS:

पालघर – योगेश चांदेकर[7276644464]

डहाणू तालुक्यातील साखरा डॅमपासून अवघ्या 250 मिटर अंतरावर रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत अनोळखी टैंकरमधून घातक रसायन टाकल्या संबंधी एक व्हिडिओ मुंबई इ न्यूजच्या हाती लागला आहे. एकूण 12 टन केमिकल असलेल्या टँकरमधील 2 टन केमिकल ओतले असल्याचा खुलासा यावेळी ड्रायव्हर आणि सोबत असणाऱ्या व्यक्तीने केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या कागदपत्रांचा आधार घेत टँकर मधील केमिकल हे Sarex Overseas, बोईसर यांचे असल्याचा दावा व्हिडीओ मध्ये केला आहे.

काँट्रॅकटर शर्मा ऑनलाइन, बोईसर या नावाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाशी संपर्क केला असता या माहितीला अद्याप अधिकृत पुष्टी मिळू शकलेली नाही, मात्र या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

साखरा डॅम परिसरा पासून ते बाजुच्या पट्यावर साधारण 1 किलो मीटर पर्यंत घातक केमिकल खाली अवैधपने विसर्जित केले असून एक किलोमीटर पर्यंत असलेल्या साइड पट्टीवर असलेली झाड़े जळून गेली आहेत तर मोठ्या प्रमाणात केमिकलची दुर्गंधि येत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here