पालघर: डहाणू पोलिसांनी उभारला पहिला सॅनिटायझर कक्ष..!

0
396

पालघर – योगेश चांदेकर:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध पद्धतींनी प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कारागिरांच्या मदतीने निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी केली आहे. पालघर जिल्ह्यात असा पहिलाच निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. कामानिमित्त पोलीस स्टेशनला येणाऱ्या नागरिकांनी निर्जंतुकीकरण कक्षाचा वापर करावा असं आवाहन डहाणू पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी केलं आहे.

निर्जंतुकीकरण कक्षाच्या दोन्ही बाजूला सॅनिटायझरचा फवारा सुरु होण्यासाठी बटन आहेत. बटन दाबताच सॅनिटायझरचा संपूर्ण अंगावर फवारा होऊन निर्जंतुकीकरण होते. याच संकल्पनेनुसार तलासरी, घोलवड पोलीस स्टेशन या ठिकाणीही असे निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात येणार आहेत.

  • कामानिमित्त पोलीस स्टेशनला येणाऱ्या नागरिकांच्या व पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी केली आहे. याच संकल्पनेनुसार तलासरी, घोलवड या ठिकाणीही असे निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात येणार आहेत. – मंदार धर्माधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी
  • कामानिमित्त पोलीस स्टेशनला येणाऱ्या नागरिकांच्या व पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कारागिरांच्या मदतीने निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी केली आहे. – गोविंद ओमासे, पोलिस निरीक्षक डहाणू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here