कौतुकास्पद: पालघर जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष पोलीसांसाठी सॅनिटायझर व्हॅन..!

0
423

पालघर – योगेश चांदेकर:
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. संचारबंदीचे काटेकोरपणे पालन केलं जावे यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. नाकाबंदीसाठी उन्हातान्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पालघर जिल्हा पोलीस प्रशासनाने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सॅनिटायझर व्हॅन तयार करण्यात आलेली आहे. सदरची व्हॅन नाकाबंदीच्या ठिकाणी जाऊन नाकाबंदीसाठी असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे निर्जंतुकीकरण करणार आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटायझर फ्रेम ह्या बहुतेक पोलीस ठाण्यात बसवण्यात आल्या आहेत. मात्र उन्हातान्हात आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरने फक्त हात स्वच्छ करता येत होते. नाकाबंदीसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांनाच संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. याच गोष्टीचा विचार करून पालघर पोलीस दलाकडून या व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here