पालघर: 70 वर्षांच्या म्हातारीच्या जिद्दीपुढे त्या चपलांनी देखील धन्यता मानली असेल!

0
404

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगांव जवळील डोंगरी पाड्यात राहणारी साधारणतः 70 वर्षे वय असणारी महिला अनवाणी पायांनी चालताना सामाजिक कार्यकर्ते सचिन भोईर यांना दिसली. शहरापासून 17 -18 किमी दूर असलेल्या गारगाव गावाजवळील एका पाड्यातून बँकेत 500 रुपये पैसे काढायला आलेली ही वृद्ध महिला, पायाला उन्हामुळे तापलेल्या रस्त्याचे चटके बसू नयेत यासाठी तिने पिशवी गुंडाळलेली होती. बँकेत पैसे आलेले नाहीत म्हणून भर दुपारी अनवाणी पायाने आपल्या गावाकडे जात असणारी ती म्हातारी ही ग्रामीण भागातील कोरोनाचे उघड्या डोळ्यांनी दिसणारे वास्तवच म्हणावे लागेल.

सामाजिक कार्यकर्ते सचिन भोईर यांनी त्या वृद्ध महिलेला शेजारीच काही अंतरावर असणाऱ्या चपलांच्या दुकानातून एक चप्पल जोड घेऊन दिली. प्रथमतः त्या वृद्धेने त्या चपला घेण्यास नकार दिला मात्र अग्रहयुक्त आर्जव केल्यानंतर ती तयार झाली. आज कोरोनाच्या संकटकाळात आपल्या आजूबाजूला अशाप्रकारची परिस्थिती सर्वत्रच दिसत आहे. अशावेळी आपण जागृत राहून शक्य तिथे काठी बनून तर शक्य तिथे डोळस बनून मदत करावी हेचं मुंबई ई न्यूजच्या वतीने आवाहन..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here