पालघर – योगेश चांदेकर :
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेले असताना महाराष्ट्र राज्यसरकार अतिशय क्रियाशील पद्धतीने संपूर्ण परिस्थिती हाताळत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे वारंवार जनतेला योग्य त्या मार्गदर्शक सूचना करत आहेत असे असताना पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात जमावबंदी असताना देखील आरोग्य शिबीर घेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गरीब जनतेला सेवा देणे हा उद्देश जरी चांगला असला तरी सध्याची परिस्थिती पाहता हा प्रकार गंभीर आहे.

सदर शिबिर संपन्न झाल्याची माहिती दर्शिल होमिओपॅथीक क्लिनिक च्या फेसबुक पेजवरच देण्यात आली आहे. दर्शिल होमिओपॅथीक क्लिनिक आणि त्रिमूर्ती रोडवेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरासाठी आरोग्य विभागाकडून पूर्व परवानगी घेण्यात आली होती का? पूर्वनियोजित असले तरी आरोग्य शिबिर हे रद्द करता येत नव्हते का? सामान्यांच्या जीवाशी खेळ का मांडला? असे संतप्त सवाल आता नागरिकांमधून पुढे येत आहेत.
शिबिरात दर्शन होमिओपॅथी क्लिनिक चे तज्ञ डॉक्टर आदित्य अहिरे, त्रिमूर्ती ट्रान्सपोर्ट चे मिलिंद पारेख, विजय पारेख व प्रशांत पारेख उपस्थित होते.
अशाप्रकारची शिबिर कलम 144 लागू असताना घेणे चुकीचे आहे, संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल
डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्य चिकित्सक
जनतेच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार निंदणीय आहे, प्रशासनाने सदर घटनेची चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी.
—-
नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते