धक्कादायक: डहाणूमधील ते आरोग्य शिबिर परवानगीविनाच..!

0
356

पालघर – योगेश चांदेकर

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आरोग्य शिबीर घेण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर याप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर शिबीर हे कोणतीही पूर्व परवानगी न घेता घेण्यात आले होते असा अहवाल वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आशागड यांनी तालूका आरोग्य अधिकारी डहाणू यांना दिला असल्याचे समजते.

दरम्यान हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी दर्शिल होमिओपॅथीक क्लिनिकच्या फेसबुक पेजवरील शिबिरासंबंधी उल्लेख असल्याची पोस्टच उडवून टाकण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुढील १५ दिवस महत्वाचे आहेत अशी माहिती देत राज्यासह देशात ठिकठिकाणी जमावबंदीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. असे असताना विनापरवानगी शिबिर घेतले गेले असल्याची बाब मुंबई ई न्यूजने समोर आणल्यानंतर प्रशासनाने या बातमीची गंभीर दखल घेतली. याप्रकरणातील संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिले आहेत.

डहाणू तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील सर्व जनतेचे लक्ष याप्रकरणी प्रशासन पुढे काय कारवाई करणार याकडे लागले आहे.

शिबीर हे कोणतीही पूर्व परवानगी न घेता घेण्यात आले होते असा अहवाल प्राप्त झाला असून सदर अहवाल तहसीलदार डहाणू यांना पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आला आहे.
डॉ. संदीप गाढेकर, तालूका आरोग्य अधिकारी डहाणू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here