पालघर – योगेश चांदेकर:

पालघर विधानसभा आमदार श्रीनिवास वणगा यांचे चालकाचे विनोद कुवरा यांचे आज पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाल्याची दुःखद घटना घडली आहे. विनोद कुवरा हे वणगा कुटुंबियांचे अत्यंत जवळचे तसेच विश्वासू होते. दिवंगत खा. चिंतामण वणगा साहेबांच्या गाडीचे सारथ्य करण्यापासून ते आज श्रीनिवास वणगा यांच्या गाडीचे सारथी असा त्यांचा प्रवास राहिला. तलासरी तालुक्यातील कवाडा आवारपाडा येथील रहिवाशी असणाऱ्या विनोद यांनी आपल्या मितभाषी स्वभावाने अनेकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here