बापरे..! पालघर तालूका आरोग्य अधिकारी कार्यालयात घुसला साप…

0
367

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर तालूका आरोग्य अधिकारी अभिजित खंदारे यांच्या कार्यालयात साप आढळल्याने कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. कार्यालयातील एसीवर साप बसला असल्याचे एका कर्मचाऱ्याने पाहिले आणि त्याला धक्काच बसला. कर्मचाऱ्याने प्रसंगावधानता राखत लगेचच विरेंद्र नगर येथील सर्पमित्र आकाश पवार यांच्याशी संपर्क साधला. सर्पमित्र पवार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मोठ्या शिताफीने त्यांनी त्या सापाला पकडले. सदर साडेपाच ते सहा फूट लांबीचा साप धामिण(धामण) असल्याचे आकाश पवार यांनी सांगितले. सापाला पिशवीत बंद करण्यास सर्पमित्रास साधारण अर्धा तास वेळ लागला.

दरम्यान सकाळी ९.३० वाजता कार्यालयात साफसफाई करत असताना हा साप आढळून आला होता. त्याने तात्काळ सर्पमित्रास बोलावल्याने त्या सापाला पकडता आले. कार्यालय खोलीत उंचावर असणाऱ्या एसीवर हा साप नेमका कुठून आला याबाबत सगळेजणंच कोड्यात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here