पालघर – योगेश चांदेकर:
कोरोनाचे सर्वत्र थैमान सुरु असताना गोरगरिबांना अन्नधान्याची कमतरता जाणवू नये यासाठी ठाण्यातील विविध परिसरात फिरुन सामनाचे वृत्तसंपादक राजेश पोवळे यांनी अन्नधान्याचे वाटप केले. यावेळी शिवसेनेचे ठाणे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, शिवसेनेचे नगरसेवक सुधीर कोकाटे, विभागप्रमुख कमलेश चव्हाण आदी उपस्थित होते.

गरजुंना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी देशासह राज्यात अनेक दानशूर हात समोर येत आहेत. केंद्र व राज्यसरकाराची मदत काही ठिकाणी अद्याप मिळालेली नसल्याने समाजातील या दानशूरांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here