पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर असल्याच्या संशयातून दोन साधू व त्यांच्या चालकाची जमावाने निर्घृणपणे हत्या केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्यानंतर संपूर्ण देशात त्यावर सर्वांनीच तीव्र नापसंती व्यक्त केली होती. आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अचानक घटनास्थळाला भेट दिली व प्रकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर आज सायंकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा सरकारने निर्णय घेतला असून त्यांचा कार्यभार विक्रांत देशमुख, अपर पोलिस अधीक्षक यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याचे जाहीर केले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आजच गडचिंचले येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली, घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार गावातील सरपंच व जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून त्या दिवशीचा पूर्ण घटनाक्रम जाणून घेतला होता. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनील भुसारा, आमदार श्रीनिवास वनगा, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंखे व इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. त्यानंतर बोलताना त्यांनी गडचिंचले हत्याकांडातील आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याचा पुनरुच्चार केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here