Mumbai e News –
पालघर – योगेश चांदेकर :
नगराध्यक्षा डॉ. उज्जला केदार काळे, BGA पालघर, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट आयोजीत व कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई यांच्या सौजन्याने रविवार दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी विठ्ठल रखुमाई मंदिर हॉल माहीम, पालघर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरासाठी डॉ. संदिप वासनिक(M.S. orthopedics) हे सांधेदुखी, गुडघेदुखी या विभागातील रुग्णांची तपासणी व उपचार केले. डॉ. मृणाल परब (D.N.B. Surgical Oncology) स्तनांचे विविध आजार, स्तन जड होणे, गाठी असणे, काखेत गाठ वा सुज असणे या रुग्णांची तपासणी व उपचार केले. डॉ. श्रुती वासनिक (M. S. Opptical FAEH cornea) या डोळ्यांचे विविध आजार मोतीबिंदू, काचबिंदू या आजारांवरील रुग्णांची तपासणी व उपचार केले. २०० पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.

९०% समाजकारण आणि १०% राजकरण हा विचार घेऊन नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला केदार काळे व केदार काळे यांनी गेल्या १९ वर्षांमध्ये २०० पेक्षा अधिकवेळा आरोग्य शिबीरे आयोजित केली आहेत. “यापुढे देखील आरोग्य शिबिरासोबत इतर समाजउपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा अखंड सुरु राहील. पुढील शिबिराद्वारे जास्तीत जास्त रुग्णांना सामावून घेत आरोग्यसुविधा देण्याचा प्रयत्न राहील. समाजातील सर्व घटकांचे आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी प्रयत्नशील राहणार आहे” असं मत नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला केदार काळे व केदार काळे यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here