मुंबई ई न्यूज नेटवर्क: 

श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हिने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पालघर येथील गावे दत्तक घेऊन लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या अनेक बॉलीवूड कलाकार गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे येत असल्याचे पहायला मिळत असून त्यात आता जॅकलिन फर्नांडिसची भर पडली आहे.

श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिसने पालघरमधील पाथर्डी आणि सकूर ही दोन गावे दत्तक घेतली आहेत. पालघरमधील कुपोषणाविरुद्ध लढण्यासाठी तिने ‘ऍक्शन अगेन्स्ट हंगर फाऊंडेशन’ सोबत करार केला आहे. तीन वर्षांसाठी असलेल्या या योजनेतून गावातील कुपोषित गावकऱ्यांना अन्न-धान्य तसेच अन्य सुविधा देणे, कुपोषणाविषयी जागरूकता सत्र, 150 महिलांची नवजात बाळांची देखभाल करणे आणि त्यांना सक्षम बनविण्यासाठी जागरूकता निर्माण करणे, कुपोषण दूर करण्याची साधने उपलब्ध करून देणे, 20 महिलांना गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत साह्य देणे या साहाय्यभूत गोष्टींनाच समावेश आहे.

या योजनेची माहिती देताना जॅकलिन म्हणाली, की कोरोना महामारीमध्ये असे काही तरी केले पाहिजे असा विचार माझ्या मनात आला आणि मी हा निर्णय घेतला. या दोन गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या परियोजनेविषयी बोलताना जॅकलिन म्हणाली की,“या परियोजनेतून जवळपास 1,550 लोकांपर्यंत पोहोचता येणार असून गावकऱ्यांबरोबरच लहान मुलांचादेखील समावेश असेल. त्यांच्या कुपोषणाची तपासणी केली जाईल. समाजसेवा करणे मला आवडते आणि मला ही शिकवण माझ्या आई-वडिलांकडून मिळालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here