कोल्हापूर: ‘गोकुळ’ दूध संघाची निवडणूक स्थगित होणार?

0
468

मुंबई (दिनांक 05 एप्रिल): राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात दिवसभर जमावबंदीसह रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासह शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या निवडणुकीचे काय होणार? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर उत्तर देताना पोटनिवडणूक ठरल्याप्रमाणे होईल असं स्पष्ट केलं. ‘राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीस यातून सूट देण्यात आली आहे. कारण ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने लावलेली आहे. तर, सहकारासह राज्य सरकारच्या अखत्यारीत ज्या निवडणूक येतात त्या पुढे ढकलण्याची चर्चा देखील झाली आहे,’ अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

त्यामुळे राज्याच्या अखत्यारीत येणाऱ्या व सध्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक स्थगित होतेय का हे जरी अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी तसे संकेत अजित पवार यांच्या उत्तरावरून मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here