पालघर: युरिया नक्की मुरतोय तरी कुठं.. शेतकरी अनुदानित युरिया पासून वंचितच?

0
412

पालघर – योगेश चांदेकर:

मुंबईसह उपनगरातील शोषित, अन्यायग्रस्तांचा आवाज बनत मुंबई ई न्यूजने आजवर अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केलं आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक गैरप्रकारांना उजेडात आणण्याचं काम मुंबई ई न्यूजने केलेलं आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून सबसिडी यूरियाचा मोठा काळाबाजार होत असल्याची खात्रीलायक माहिती पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांना मिळाली. अगदी राजरोस खुलेआम शेतकऱ्यांना युरियाचा साठा उपलब्ध नसल्याचे सांगत हा युरिया थेट कंपन्यांना विकला जात आहे.

पालघर जिल्ह्यात सबसिडी यूरिया येत असून गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांना याचा जरासा देखील संशय न येऊ देता थेट कंपन्यांना विकला जातो. शासन शेतकऱ्यांना शेतीच्या वापरासाठी अनुदानित युरिया कृषी केंद्रांना पुरवते, कृषी केंद्रे सदर युरिया फक्त कागदावरच वितरित करतात. यांतील मोठ्या प्रमाणात युरिया थेट कंपन्यांना पुरवला जात आहे. यासाठी एक मोठी लॉबी सक्रिय असून जिल्ह्यातील अनेक बड्या प्रस्थांचा यामध्ये समावेश आहे.

औरंगाबाद येथील अनेक शेतकऱ्यांनी युरिया मिळत नसल्याच्या तक्रार कृषीमंत्री दादा भुसे यांना केली. या तक्रारीची दखल घेत शेतकऱ्यांना खतं, बियाणं मिळत आहेत की नाही हे तपासण्यासाठी दादा भुसे यांनी स्वत: दुकानात जाऊन पडताळणी करण्याचं ठरवलं. पण यावेळी दादा भुसे यांनी कृषीमंत्री म्हणून न जाता सामान्य शेतकरी बनून दुकानात पोहोचले. यावेळी दुकानदार खत असतानाही देण्यास नकार देत असल्याचं भुसे यांच्या निदर्शनास आलं. यानतंर त्यांनी जिल्हा कृषी अधिक्षकांना कारवाईचे आदेश दिले. तसेच भुसे यांनी यावेळी औरंगाबादमधील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देशही दिले.

कृषिमंत्री व पालकमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले तर पालघर जिल्ह्यातील केमिकल कंपन्यांना अनुदानित युरिया विक्रेत्यांचे एक मोठं रॅकेट उघडकीस येईल. मुंबई ई न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार साधारणतः 2009 पासून हा प्रकार सुरु असून यांतील मुख्य सूत्रधार हा बडा लोकप्रतिनिधी असू शकतो असा संशय आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here