दुरुस्तीचे काम झाले सुरु

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील सफाळे भागातील वाढीव या गावात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विजेच्या पोलवरील दोन विद्युत तारा तीन वर्षांपूर्वी खाली आल्या होत्या. त्यावर कर्मचाऱ्यांनी तात्पुरती डागडुजी करत लाकडी खांबास तारा टांगल्याची बातमी मुंबई ई न्यूजने प्रसिद्ध केली होती. याबातमीची तात्काळ दखल घेत किरण हरिष नागावकर, पालघर मंडळ अधीक्षक अभियंता यांनी मुंबई ई न्यूजचे पालघर प्रतिनिधी योगेश चांदेकर यांच्याकडून याबाबतची सविस्तर माहिती घेतली होती. दुरुस्तीची गरज असणाऱ्या वाढीव वैतीपाडा याभागात विजेचे नवीन खांब पुढील चार दिवसांतच बसविण्याच्या सूचना त्यांनी मुकुंद देशमुख, उप कार्यकारी अभियंता – सफाळे उप विभाग यांना दिले आहेत.

किरण हरिष नागावकर, पालघर मंडळ अधीक्षक अभियंता यांनी हि घटना समोर आणल्याबद्दल मुंबई ई न्यूजचे आभार मानले. दरम्यान घटनास्थळी ५ पोल आणण्यात आले असून दुरुस्तीचे काम सुरु झाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी मुंबई ई न्यूजला दिली आहे. अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांनी याप्रकरणी लक्ष घालून तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिल्याबद्दल वाढीव ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.

“वाढीव येथील परिस्थिती समजली, तेथील माहिती घेत तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी ज्या-ज्या ठिकाणी अशाप्रकारे दुरुस्तीचे काम करणे गरजेचे आहे ते महावितरणच्या निदर्शनास आणून दिल्यास त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येऊ शकते. त्यामुळे होणारी संभाव्य हानी टाळता येईल.” अधीक्षक अभियंता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here