MUMBAI e NEWS –
पालघर-योगेश चांदेकर : 
पालघर तालुक्यातील हिरवे पिंपळपाडा आश्रमशाळेत जांभूळमाथा येथील नववीत शिकणाऱ्या सुनिल चंदर खांडवी (वय 15 ) या मुलांने शाळेतील मुलींच्या बाथरूम मध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे सदरची घटना रविवारी दुपारी घडल्याची माहीती मिळत आहे.

सोमवारी सुनीलची आई सकाळी त्याला भेटण्यासाठी गेली असता मुख्यधापकांनी सांगितले त्याला मी कालच सुट्टी दिली आहे परंतु सुनील घरी आला नसल्याने हा प्रकार चव्हाट्यावर आला अधीक्षकांनी सुनीलच्या नावाची बनावट सही करून हे आत्महत्या चे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सुनिलच्या वडिलांनी केला आहे.
यावेळी अधीक्षक आणि मुख्यधापकाना समोर आल्यावरच आम्ही प्रेत ताब्यात घेऊ असा पवित्रा नातेवाईकानीं घेतल्याने आश्रमशाळा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणाचा अधिक तपास मोखाडा पोलीस करत असून अधीक्षक आणि मुख्यधापकवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी मुलाचे वडील चंदर महादू खांडवी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here