पालघर ब्रेकिंग: डहाणूत म्हैशी घेऊन जाणारा ‘संशयित’ टेम्पो अडवला?

0
391

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील तणाशी येथे गावकऱ्यांनी म्हैशी नेत असलेला टेंपो अडवला आहे. हा टेम्पो कत्तलखान्याकडे जात असल्याचा संशय आल्याने गावकऱ्यांनी हा टेम्पो अडवला आहे. लॉक डाउनच्या काळात जनावरांचे सर्व खरेदीविक्री बाजार बंद असताना टेम्पोमध्ये तीन म्हैशी घेऊन जात असल्याने गावकऱ्यांना शंका आली आणि त्यांनी टेम्पो थांबवून टेम्पोचालकास याबाबत विचारणा केली.

पोलीसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत अशी माहिती मिळते आहे. हा टेम्पो कुठून आला व तो कुठे जात होता याबाबत सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here