पालघर: …अन् शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या दलालांना फुटला घाम..!

0
430

पालघर – योगेश चांदेकर:

मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांनी रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांची लुबाडणूक झाली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आणल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबाबत सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या लढ्याला ताकद देण्याचे काम केले. समाजमित्र मानवविकास संघटन, महाराष्ट्र् राज्य कार्याध्यक्ष विजय वझे व चांदेकर यांना हे सत्य उजेडात आणल्याची किंमत म्हणून मानहानी केल्याचे गुन्हे अंगावर घ्यावे लागले. नेहमीच शेतकरी प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी लक्ष घालून दोषींविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्ह्यात जोर धरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या दलालांना फुटला घाम फुटला असून जिल्हावासियांमध्ये सध्या हा विषय सर्व चर्चांचा केंद्रबिंदू ठरत आहे.

दरम्यान सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच रिलायन्सने बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित गरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या संघर्षाविषयीची सुरुवातीपासूनच माहिती असणाऱ्या फडणवीसांनी याप्रश्नी लक्ष घातल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लुबाडणुकीची उच्च स्तरीय चौकशी होणार हे स्पष्ट दिसत असल्याने जिल्ह्यात या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु आहेत. गेल्या आठवड्यात फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना पत्र लिहून शेतकऱ्यांचे पैसे लाटणाऱ्या दलालांविरोधात गुन्हा नोंदविण्याची विनंती केली आहे.

“स्थापने पासूनच शिवसेना हि कष्टकऱ्यांच्या, शोषितांच्या मागे भक्कमपणे उभी आहे. त्यामुळे दलालांमध्ये कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी असतील तरी त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारवाई करतील. शेतकऱ्यांना जास्तीचा लाभ मिळवून देण्यामध्ये माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच उद्धवजींचा सहभाग होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचे नुकसानभरपाईचे पैसे लुबाडणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई करावी.” असे प्रांजळ मत जिल्ह्यातील शिवसेनेच्या जबाबदार पदाधिकाऱ्याने व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here