[पालघर-योगेश चांदेकर]:
पालघरजवळच्या तारापूर इथं एनके फार्मा या केमिकल फॅक्टरीत शनिवारी ऑटो क्लेव्हची चाचणी करण्यात येत होती. हि चाचणी करत असताना संध्याकाळी सातच्या सुमारास झालेल्या स्फोटातून लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला. या भिषण स्फोटातून प्राची राहुल सिंग(वय – 6 वर्ष) व रुतिका राहुल सिंग (वय – 3 वर्ष) या दोघी चिमुकल्या बहिणी दैव बलवत्तर असल्यानेच वाचल्या आहेत. दुर्दैवाने त्यांची आई निसु व आज्जी माधुरी या दोघींचा या स्फोटात मृत्यु झाला आहे. प्रथमोपचार केल्यानंतर दोन्ही बहिणींना घरी सोडण्यात आले.

स्फोट झाला त्यावेळी या मुलींचे वडील राहुल सिंग जवळील पानाच्या टपरीवर होते. वडिलांसोबत आलेल्या या मुली कंपनीच्या गेट जवळच खेळत असल्याने सुदैवाने वाचल्या. स्फोटामुळे उडालेल्या इमारतीचे काही तुकडे लागून किरकोळ जखमी झाल्या होत्या. “आईविना पोरक्या या दोन लहान मुलींचा आईच्या मायेशिवाय कसा साभांळ करायचा. मुलींनी आई-आज्जी कुठे गेली विचारलं तर काय सांगणार. पत्नी आणि आई गेल्याचं दुःख मानायचं कि मुली वाचल्याचा सुख” अशा शब्दात आपल दुःख वडील राहुल सिंग यांनी सांगितले.

पालकमंत्री दादा भुसे यांची दुर्घटनास्थळाला भेट
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे व महाराष्ट्राचे उद्योग मंत्री मा.ना. सुभाष देसाई यांनी आज तारापुर, ता. बोईसर, जि. पालघर येथील औद्योगिक वसाहतीतील स्फोट झालेल्या ए. एन.के. फार्मासिटीकल्स कंपनीच्या दुर्घटना स्थळाला भेट देवून पाहणी केली. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

तात्काळ मदत व बचावकार्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कार्यतत्परता दाखवल्याने जखमींना उपचार – प्रभाकर राऊळ शिवसेना माजी जिल्हा प्रमुख

घडलेली घटना हि अतिशय दुःखदायक आहे. मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना देव हा आघात सहन करण्याची शक्ती देवो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्फोटानंतर संपूर्ण घटनेवर स्वतः लक्ष ठेवून प्रशासनाला तात्काळ बचावकार्य सुरु करण्याच्या सूचना दिल्याने जखमींना तातडीने उपचार मिळाले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तात्काळ मदत व बचावकार्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कार्यतत्परता दाखवल्याने जखमींना उपचार मिळण्यास मदत झाली.

दोषींवर तात्काळ कारवाई करावी – कुंदन संखे अध्यक्ष निर्धार संघटना तथा शिवसेना जेष्ठ कार्यकर्ते
ज्या कंपनीत स्फोट झाला त्या कंपनीला नुकताच परवाना मिळाला होता आणि सुरुवातीच्या चाचणी दरम्यानच हि घटना घडली आहे. त्यामुळे जर प्रकरणामध्ये कोणी दोषी असेल तर तात्काळ चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here