तारापूर MIDC’त केमिकल कंपनीला आग; शर्थीचे प्रयत्न सुरू

0
421

पालघर – योगेश चांदेकर[

पालघर जिल्ह्यातील तारापूर M.I D.C येथील T 101 हरशूल केमिकल कंपनीमध्ये लागलेल्या भयंकर आगीमध्ये लाखो रुपयांचे केमिकल व इमारत जळून खाक झाली आहे. दुर्घटना स्थळी अग्निशामक दल, पोलीस प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी तातडीने हजर झाले व आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करत मदत कार्यास सुरु आहे.

या दुर्घटनेत 2 कामगार जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. जखमींमध्ये विनय कुमार बिंद (वय 27 वर्ष) 25 % भाजला आहे, तर हेमंत नाथूराम बारी (वय 42 वर्ष) 15% भाजला आहे. जखमींना जवळील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत आणखी कोणतीही स्पष्ट व अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here