पालघर: अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटख्याची तस्करी; ट्रक पलटी झाल्याने धक्कादायक प्रकार उघड

0
451

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वाहतुकीव्यतिरिक्त इतर सर्व वाहतूक बंद आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुजरात राज्यातून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा व अन्य तंबाखूजन्य वस्तूंची वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. पालघरमधील सातीवली येथे चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने पलटी होऊन अपघात झाल्याने हि गोष्ट उघडकीस आली. लॉक डाऊन चक्क भाजीपाल्याच्या गाडीतून गुटख्याची तस्करी होत असल्याचे उघड झाल्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू असल्याने अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी सरकारने या वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी दिलीय. मात्र नेमका याच सवलतीचा गैरफायदा घेत काहीजण महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा व अन्य तंबाखूजन्य वस्तूंची तस्करी करत असल्याचं समोर आले आहे.

पालघरमधील सातीवली येथे चालकाचा ताबा सुटल्याने पलटी होऊन अपघातपालघरमधील सातीवली येथे चालकाचा ताबा सुटल्याने पलटी होऊन अपघात झाला आणि हा प्रकार उघडकीस आला. ट्रकमधून बाहेर पडलेला गुटखा पाहिल्यानंतर उपस्थितांनी कपाळावरचं हात मारून घेतला. ‘वरून कीर्तन आतमध्ये तमाशा’ या म्हणीचा प्रत्यय या उपस्थितांना यानिमित्ताने आला. सुमारे १५ लाख रुपये किंमतीचा गुटखा आणि २० लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण ३५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असल्याचे समजते. संबंधित गाडी मालक आणि चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताच्या घटनेनंतर ट्रकचा चालक ट्रकसोडून पसार झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here