पालघर: दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ‘त्या’ तीन अपत्य असणाऱ्या संचालकाचे पद धोक्यात?

0
733

तलासरी प्रतिनिधी – जितेंद्र पाटील:

दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या मार्च महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीत कृषी पतपुरवठा मतदार संघ तलासरी तालुक्यातुन विजयी झालेले उमेदवार लक्ष्मण डोंबरे यांना अपात्र ठरवण्याची मागणी महविकास आघाडीचे उमेदवार लाडक खरपडे यांनी विभागीय सहनिबंधक कोकण भवन येथे केली आहे. दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुका मार्च महिन्यात पार पडल्या या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी व भाजप प्रणित सहकार पॅनल ने 21 पैकी 18 जागांवर विजय मिळवत आपलं वर्चस्व स्थापन केले होत.

सहकार पॅनल मधील प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदार संघ तलासरी तालुक्यातील विजयी उमेदवार लक्ष्मण डोंबरे यांना अपात्र ठरवण्यात यावे यासाठी प्रतिस्पर्धी महविकास आघाडीचे  उमेदवार लाडक खरपडे यांची विभागीय सहनिबंधक कोकण भवन येथे तक्रार हरकत दाखल करण्यात आली आहे. हरकत घेऊन दोन महिने उलटूनही सुनावणी होत नसल्याने खरपडे न्यायचा प्रतीक्षेत आहेत.

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार डोंबरे यांना तीन अपत्य असल्याने नामनिर्देश पत्र पडताळणी वेळी हरकत घेण्यात आली होती. मात्र पडताळणी वेळी निवडणूक निर्णय अधिकारी पालघर यांनी कलम 73 क कलमाचा दूरउपयोग करून उमेदवारी घोषित केल्याचा आरोप लाडकं खरपडे यांनी करीत विजयी उमेदवार लक्ष्मण डोंबरे यांचे संचालक मंडळातील सदस्यत्व रद्द करून अपात्र ठरविण्याची मागणी केली आहे. याबाबत विभागीय सहनिबंधक कोकण भवन येथे न्यायालयात दाद मागण्यात आली असून अद्यापही ह्यावर निर्णय घेण्यात आलेला नसल्याने लाडकं खरपडे यांनी नाराजी व्यक्त करीत उच्च न्यायालयात दावा दाखल करण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. तीन अपत्य कारणाने लक्ष्मण डोंबरे यांचं सदसत्व धोक्यात आले असून सदसत्व रद्द झाल्यास सहकार पॅनला धक्का बसणार आहे.
” दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या मार्च महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीत मी महविकास आघाडीचा उमेदवार होतो.प्रतिस्पर्धी उमेदवार डोंबरे यांना तीन अपत्य आहेत याबाबत आम्ही सबळ पुरावे देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हरकत घेऊन नामनिर्देश पत्र रद्द करण्याची मागणी केली होती परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कलम 73 क चा दुरुपयोग करीन उमेदवारी घोषित केली. त्यामुळे हे सदसत्व रद्द करण्यात यावे अशी आमची मागणी आहे.”
– लाडक खरपडे, प्रतिस्पर्धी उमेदवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here