स्थानिक गुन्हे शाखेने गुटखा भरलेल्या टेम्पोसह दोन आरोपी केले जेरबंद

0
451

मुंबई : योगेश चांदेकर –
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार फाटा पुलावर मुंबई वाहिनीवर एक पांढर्‍या रंगाच्या पिकअप टेम्पो मध्ये आज सकाळी ५ वाजता गुटखा आणला जाणार असल्याची गुप्त माहिती सहायक फौजदार सुनील नलावडे यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांना दिली असता गायकवाड यांनी लगेच दीपक राऊत, नरेंद्र पाटील , कैलास पाटील यांना ही माहिती दिली. त्यांनी चिल्हार फाटा पुलावर सापळा लावला. पांढर्‍या रंगाची पिकअप टेम्पो एम एच ०२ ईआर २५६९ आज सकाळी साडेआठ वाजता आढळली.

पोलिसांनी टेम्पो थांबवून गाडीची झडती घेतली असता. त्यामध्ये भाजीपाला आढळून आला पण नीट तपासणी केली असता त्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा), सुगंधित सुपारी आणि पान मसाला असा साडे सात लाखांचा गुटखा सापडला तसेच माल आणि वाहन असा एकूण 14 लाख 41 हजार 400 रुपयांचा मुद्देमालासह दोन आरोपींना मोठ्या शिताफीने पोलिसांनी पकडल आहे.

दरम्यान मनोर स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गुटख्यासह पिकअप टेम्पो जप्त केला आहे. गुजरात मधून हा गुटखा आणला होता व तो मुंबईच्या दिशेने वितरित होणार होता तसेच टोळीमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे याबाबत पुढील तपास पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here