‘या’ शिक्षकांना सेवेत सामावून न घेतल्यास तीव्र आंदोलन – आ. विनोद निकोले

0
380

MUMBAI e NEWS:
[पालघर – योगेश चांदेकर]

पालघर जिल्ह्यातील डहाणू व जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेत बहूचर्चेत असणारी वादग्रस्त संगणक नोकर भरतीला तात्पुरती डहाणू प्रकल्प अधिकारी सौरभ कटियार व जिल्हाधिकारी यांनी स्थगिती दिली होती. मात्र हे २४ संगणक शिक्षक गेल्या 8 ते 9 वर्षांपासून आश्रम शाळेत अल्प मानधनावर काम करत आहेत. या 24 स्थानिक आदिवासी शिक्षकांना डावलून नवीन 57 पदाची संगणक शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

सदर शिक्षकांना सेवेत सामावून घेण्याबाबतीत वेळो-वेळी पत्रव्यवहार, आंदोलन, उपोषण करून ही डहाणू व जव्हार आदिवासी प्रकल्प खाते गांभीर्याने विचार न करता अनेक त्रुटी व वादग्रस्त असणारी संगणक भरती करू पाहत आहे. जोपर्यंत 24 पीडित संगणक शिक्षकांचा शासन दरबारी विचार गेला जात नाही तोपर्यंत नवीन संगणक भरती थांबवण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा आज डहाणू मतदार संघाचे आमदार कॉ. विनोद निकोले व त्यांच्या पक्षाचे चंद्रकांत वरठा, कार्यकर्ते यांनी आदिवासी प्रकल्प डहाणू यांना लेखी निवेदनात दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here