पालघर: शेतकऱ्यांप्रमाणे ‘या’ कामगारांना देखील जगण्यासाठी सरकारने मदत करावी..!

0
461

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील तारापूर, चिंचणी, वरोर, वाढवण, बहाड, वासगाव, तडीयाले, गुंगवाडा, डहाणूखाडी, धूमकेत, माडगाव, ओसार, चंडीगाव, तणाशी या गावांसह २० ते २५ गावांमधील लोकांचे डायमेकिंग हेच मुख्य उदरनिर्वाहाचे साधन आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु झाले आणि त्यामुळे या सर्व कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. कोरोनामुळे या कामगारांचे सर्व काम ठप्प झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांप्रमाणेच डायमेकर कामगारांना देखील सरकारने मदत करावी अशी मागणी होत आहे.

विऩाशकारी काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन अवलंबला आहे, त्याचा माेठा फटका या डायमेकर्सना साेसावा लागत आहे. किंबहुना सर्वांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे जसे इतर व्यावसायिकांना अर्थ सहाय्य दिले जाते, त्याप्रमाणे डाई मेकर्सना सुध्दा अर्थसहाय्य मिळावे अशी सरकारकडे मागणी होत आहे. देशविदेशातून अशाप्रकारे डाय मेकिंगच्या ऑर्डर या भागातील कामगारांना मिळत असतात, अतिशय कलात्मक डिजाईन करण्यात माहीर असणाऱ्या या कारागिरांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. आजपर्यंत डाई मेकिंग कारागिरांनी कधीही अशाप्रकारे मदतीसाठी हात शासनाकडे पुढे सरसावला नाही, परंतु ह्या कोरोना महामारीच्या लॉक डाऊन मध्ये ही वेळ पहिल्यांदाच आली आहे.

“आजवर डायमेकिंग कारागिरांनी शासनाकडे कधीही मदतीसाठी याचना केलेली नाही. आपल्या कलेच्या जोरावर आत्मनिर्भर असणाऱ्या हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आमच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे अशाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहानुभूतीपूर्वक आमच्या मागण्यांचा विचार करून आम्हाला मदत करावी अशी आमची विनंती आहे.” – सागर कडू (वाढवण)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here