…यामुळे मुंबईतील पाणीकपात होणार बंद..!

0
358

मुंबई : योगेश चांदेकर –
मुंंबईमध्ये ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासुन तुफान पाउस सुरु आहे. सुदैवाने यावेळेस केवळ शहरातच नव्हे तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात सुद्धा चांगला पाउस झाला आहे. २४ ऑगस्टपर्यंत सातही तलावात ९४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. अतिरिक्त नगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९५ टक्केंची सरासरी गाठल्यावर मुंबईत सध्या सुरू असलेली १० टक्के पाणीकपातही मागे घेतली जाणार आहे. मुंबईमध्ये यंदा धरणक्षेत्रात जुलै अखेरीपर्यंत पुरेसा पाऊस बरसत नसल्याने ५ ऑगस्ट पासून २०% पाणीकपात लागू केली होती. परंतू २३ ऑगस्टपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावाच्या साठ्यात वाढ झाली आहे.

जुलैमध्ये विहार, तुलसी तलाव पुर्ण पणे भरला होता. तर दुसरीकडे, मोडकसागर तलाव परिसरात असलेले वैतरणा धरण पूर्ण भरले आहे. त्यात लवकरच तानसा धरणही भरेल असा अंदाज आहे. उर्वरित ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाचे अंदाज आहेत. त्यामुळे ही धरणे लवकर भरुन पाण्याची चिंता कमी होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here