पालघर: स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या कोरोना योध्यांसाठी तरुणाची आगळीवेगळी मानवंदना..!

0
376

पालघर – योगेश चांदेकर:

संपूर्ण भारतात लॉक डाऊन लागले त्या दिवसापासून ते आज पर्यंत सतत संपूर्ण आरोग्य कर्मचारी (डॉक्टर, नर्स, वार्ड बॉय, लॅब टीम आणि संबंधित इतर), पोलीस, होमगार्ड, विविध संस्था, महाराष्ट्र विद्युत विभाग, कोस्टगार्ड, शेतकरी, मच्छिमार, सामान्य जनता तसेच इतर शासकीय व निमशासकीय यंत्रणा न थकता काम करत आहेत. या सर्वांचे कार्य सतत चालू ठेवण्यासाठी त्यांचे मनोबल उचवणे फार गरजेचं आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विविध राज्यातील योध्यांशी संपर्क साधून त्यांचे मनोबल वाढवले आहे.

०३ मे २०२० रोजी वायू दल, तटरक्षक दलाकडून ही ह्या क्षेत्रातील योध्याना मानवंदना देण्यात आली. तसेच विविध राज्य सरकारे जसे हरयाणा सरकार आरोग्य सेवकांना १.५ पटीने पगार देत आहेत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स असे विविध तऱ्हेने मनोबल वाढवण्याचे काम करत आहेत. आपण ही काही तरी या योध्यांना एक वेगळ्या पद्धतीने मानवंदना देऊ असे धाकटी डहाणूतील प्रज्योत तामोरे याने ठरविले आणि यादरम्यान लॉक डाऊनला तडा जाऊ नये याची योग्य ती खबरदारी देखील घेतली. मडगाव ते मुंबई आणि मडगाव ते कन्याकुमारी पर्यंतचा सायकल चालवण्याचा अनुभव असल्याने सायकल चालवूनच मानवंदना देऊ असे प्रज्योतने निश्चित केले आणि डहाणू पुल ते वरोर हा मार्ग निवडून २४ मे २०२० या दिवशी हि आगळी वेगळी मानवंदना दिली.

प्रज्योतचे नियोजन २४ तासाचे होते पण कुटुंबियांच्या दबावामुळे त्याने १५ तास (सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत) सायकल चालवून २४६.२८ किमी (जाऊन – येऊन फेऱ्या) अंतर कापून सर्व कोरोना योध्यांना मानवंदना देत त्यांचे मनोबल वाढवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला.या १५ तासात फक्त दुपारचे जेवण करण्यासाठी एक ब्रेक घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here