पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांच्याकडून मजुराला मारहाण; व्हिडीओ व्हायरल..!

0
511

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्हा प्रशासनाने बुधवारी परप्रांतीय मजुरांसाठी तीन रेल्वेगाड्यांची सोय केली होती. साहजिकच यामुळे प्रचंड संख्येने परप्रांतीय मजूर हे स्टेशन परिसरात जमले होते व त्यामुळे यंत्रणेवर ताण निर्माण झाला. पालघर तहसीलदारांनी अगोदरच लॉक-डाउनमुळे अस्वस्थ झालेल्या व आपल्या गावी उत्तर प्रदेशला जाणा मजुराला मारहाण केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

काल प्रशासनाकडून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या कामगारांसाठी 3 विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. एकाच दिवसात तीन गाड्या असल्याने आर्यन हायस्कूलच्या मैदानावर टोकन गोळा करण्यासाठी कामगारांची गर्दी झाली होती. पालघर तहसीलदाराने हि गर्दी नियंत्रित करण्यासाठी पालघर पोलीस स्टेशनच्या पोलीसांना बोलावून घेतले. भुकेलेल्या तहानलेल्या कामगारावर हात उचलण्याचा, मारहाण करण्याचा अधिकार तहसीलदारांना दिलाच कुणी असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. याप्रकरणाची चौकशी करून तहसीलदार सुनील शिंदे यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का हे पहावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here