MUMBAI e NEWS –
मुंबईतील प्रसिद्ध वाडिया हॉस्पिटल बंद होण्याच्या मार्गावर होते. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी कोणत्याही स्थितीत वाडिया हॉस्पिटल बंद होऊ देणार नाही असा आक्रमक पावित्रा घेतला होता. यासाठी शर्मिला ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या बैठकीला महापौर आणि आयुक्त सोबत होते. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी वाडिया रुग्णालय बंद होणार नाही असं आश्वासन दिलं. 46 कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे अस अजित पवार यांनी सांगितले आहे. ते स्वतः अर्थमंत्री आहेत. त्यामुळे आर्थिक तरतूद करणं त्यांच्याच हातात होतं. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर गोष्टींसाठी 105 कोटी रुपये बाकी आहेत. त्यावरही लवकरच निर्णय होईल, असं शर्मिला ठाकरे यांनी या भेटीनंतर सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here