MUMBAI e NEWS [पालघर – योगेश चांदेकर]:
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजू शेट्टी, यांच्यासह बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची वक्तव्य केल्याने, “आमचं सरकार असताना एकही रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाही त्यामुळे आम्ही कुणाच्या आणि कसल्याही धमक्यांना घाबरत नाही. आम्ही पारदर्शक कारभार केला हे जनतेला माहित आहे. आरोप करणारांना आरोप करुद्या आणि जर कोणाला काही चौकशीच करायची असेल तर ती देखील करू द्या”, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष असून देखील राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आता सरकारमधील मंडळी भाजपच्या पदाधिका-यांना व माजी आमदार, मंत्र्यांना चौकशीची भीती दाखवत आहेत. मात्र आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचार झालाच नसल्याचा पुनरुच्चार करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. स्व. शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्याच्या आनावरण सोहळ्यासाठी फडणवीस अकलूज येथे आले होते. माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थित त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here