मुंबई | चंद्रपूर जिल्ह्यातील सहा वर्षानंतर दारूबंदी उठवण्यात आली आहे. दारूबंदीमुळे अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारी जिल्ह्यात बोकाळली होती, म्हणून हा निर्णय घेण्यात आलं असल्याचं राज्य सरकारने सांगितलं आहे. यावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला आहे.
क्या हुवा तेरा वादा जयंतराव जी सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळला दारूबंदी करणार. इस आश्वासन का?, यवतमाळ राहिलं दूर, चंद्रपुरची दारूबंदी उठवली तुमच्या सरकारने महिलांना कमी समजू नका अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चुल फुंकायची वेळ येईल, असं चित्रा वाघ म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
क्या हुवा तेरा वादा….जयंतराव जी
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 29, 2021
सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळला दारूबंदी करणार…..इस आश्वासन का…
यवतमाळ राहिलं दूर..चंद्रपुरची दारूबंदी उठवली तुमच्या सरकारने
महिलांना कमी समजू नका अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चुल फुंकायची वेळ येईल pic.twitter.com/okq3isGvmO