पालघर: युरिया माफिया कोण? चर्चांना उधाण.. कृषी विभागाचे मात्र दुर्लक्षच..!

0
86
युरिया संग्रहित छायाचित्र

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून सबसिडी यूरियाचा मोठा काळाबाजार होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर मुंबई ई न्यूजने याची बातमी प्रसिद्ध केली होती. बातमी प्रसारित झाल्यानंतर हा युरिया माफिया कोण? याची चर्चा पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे. यामध्ये काही लोकप्रतिनिधींसोबतच त्यांच्या चमच्यांचा देखील सहभाग असल्याचे शेतकऱ्यांच्या चर्चेतून ऐकण्यास मिळत आहे. आता हा लोकप्रतिनिधी कोण आणि त्याचे चमचे कोण याचा शोध घेऊन कृषी विभागाने योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु पालघर जिल्ह्यातील कृषी विभाग सध्यातरी या प्रकरणात शांतच असून या शांततेमागचं गौडबंगाल काय? हा प्रश्न देखील शेतकरी वर्गात चर्चिला जात आहे.

असे असले तरी सध्या युरियाचा अगदी राजरोसपणे काळाबाजार असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here