MUMBAI e NEWS :
मुंबई 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी मनसेचा हा महामेळावा होत आहे. या महावेळाव्यात राज ठाकरे हे पक्षाची नवी दिशा ठरवणार आणि सांगणार आहेत. त्यामुळे पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मनसे सोडून गेलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर जुने शिलेदार पुन्हा मनसेत सामील होणार का, याची चर्चा सुरू झाली.

‘ज्यांना लाचारीचा तिटकारा आहे आणि महाराष्ट्र धर्माचा अभिमान आहे त्यांनी राज साहेबांचे नेतृत्व स्वीकारायला हवे. मराठा तितुका मेळवावा…महाराष्ट्र धर्म वाढवावा,’ असं संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना खेचण्यासाठी मनसे प्रयत्न करत आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. पक्षाला नवी उभारी देण्यासाठी सोडून गेलेल्या शिलेदारांना पुन्हा मनसेत आणण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली आणि चर्चा केली. त्याचबरोबर प्रकाश महाजन यांनाही राज ठाकरे यांनी भेटायला बोलावलं होतं.

या भेटीनंतर प्रकाश महाजन म्हणाले, 23 तारखेच्या महाअधिवेशनामध्ये येण्यास राज ठाकरेंनी सांगितलं. 23 तारखेच्या अधिवेशनात मनसेत मोठ्या इनकमिंगची शक्यता आहे. राज ठाकरे यांचा हिंदुत्व मुद्दा पटला म्हणून मला राज ठाकरे यांच्यासोबत काम करायचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here